WTC Final : दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या इतिहासात अमर झाला मार्कराम, 'हा' पराक्रम करणारा पहिला खेळाडू

WTC 2023-25 Final: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ची फायनल होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Aiden Markram : दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्याही खेळाडूला न जमलेला पराक्रम मार्करामनं केला आहे.
मुंबई:

Aiden Markram, South Africa vs Australia, WTC 2023-25 Final: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ची फायनल होत आहे. इंग्लंडमधील ऐतिहास लॉर्ड्स स्टेडियमवर ही मॅच होत आहे. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा बॅटर एडन मार्करामनं चौथ्या इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावत इतिहास घडवला आहे. 

आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये सेंच्युरी करणारा मार्कराम हा पहिला दक्षिण आफ्रिकन ठरला आहे. आजवर क्रिकेट विश्ववातील मोजक्याच खेळाडूंना ही कामगिरी करता आली आहे. 

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये सेंच्युरी करणारे खेळाडू 

102  - क्लाईव्ह लॉयड - वेस्ट इंडिज - विरुद्ध ऑस्ट्रेलिया - लॉर्ड्स - 1975
 107*  - अरविंद डी सिल्वा - श्रीलंका - विरुद्ध ऑस्ट्रेलिया - लाहोर - 1996
117 - सौरव गांगुली - भारत - विरुद्ध न्यूझीलंड - नैरोबी - 2000
102* - ख्रिस केर्न्स - न्यूझीलंड - विरुद्ध भारत - नैरोबी - 2000
140*  - रिकी पॉन्टिंग - ऑस्ट्रेलिया - विरुद्ध भारत - जोहान्सबर्ग - 2003
104 - मार्कस ट्रेस्कोथिक - इंग्लंड - विरुद्ध वेस्ट इंडिज - द ओव्हल - 2004
114 - फखर जमान - पाकिस्तान - विरुद्ध भारत - द ओव्हल - 2017
102** - एडन मार्कराम - दक्षिण आफ्रिका - विरुद्ध ऑस्ट्रेलिया - लॉर्ड्स - 2025

Advertisement


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पहिल्या इनिंगमध्ये मार्करामनं निराशा केली होती. तो शून्यावरच आऊट झाला होता. पण, दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं ही कसर भरुन काढली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी तो 102 रन्सवर खेळत होता. 

Advertisement

( नक्की वाचा : SA vs AUS: कागिसो रबाडाच्या 'पंजा'नं कांगारुंची शिकार! नव्या रेकॉर्डसह उडवली वर्ल्ड चॅम्पियनची दाणादाण )

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 282 रन्सचं टार्गेट आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस आफ्रिकेनं 2 आऊट 213 रन्स केले आहेत. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस मार्कराम 102 आणि दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बवूमा 65 रन्सवर खेळ होते. त्यामुळे या ऐतिहासिक विजेतेपदापासून आफ्रिका फक्त 69 रन्स दूर आहे.

Topics mentioned in this article