Yashasvi Jaiswal Instagram Post Viral IPL 2025: आयपीएल 2025 चा सिझन राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) निराशाजनक ठरला. त्यांची टीम आयपीएल पॉईंट टेबलमध्ये 9 व्या क्रमांकावर राहिली. राजस्थाननं टीम म्हणून फॅन्सची निराशा केला. पण, वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या ओपनर्सनी दमदार कामगिरी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वैभवनं वयाच्या 14 व्या वर्षी सेंच्युरी करत सर्वांचं लक्ष वेधलं. तर यशस्वीनं त्याचा फॉर्म कायम ठेवला. त्यानं या सिझनमध्ये 43 च्या सरासरीनं 159.71 च्या स्ट्राईक रेटनं 559 रन्स केले. पण, हा सिझन संपल्यानंतर तो राजस्थानची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही वर्षांपासून फॉर्मात असलेला यशस्वी हा सर्वाधिक मागणी असलेल्या टॉप ऑर्डर बॅटरपैकी एक असल्याचं क्रिकेट विश्वात मानलं जात आहे. त्याचबरबोर तो टीमच्या खराब कामगिरीमुळे फ्रँचायझीवर पूर्णपणे समाधानी नाही, असाही अंदाज व्यक्त केला आहेत.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : 500 मिस कॉल, 4 दिवस फोन बंद, 'गुरु द्रविड' समोर वैभव सुर्यवंशीनं दिली कबुली )
यशस्वीची भावुक इन्स्टाग्राम पोस्ट
यशस्वीनं हा सिझन संपल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. त्यानंतर तो राजस्थान रॉयल्सला अलविदा करणार ही चर्चा सुरु झाली आहे. यशस्वीनं य पोस्टमध्ये म्हंटलं आहे की, 'राजस्थान रॉयल्स, प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. हा अपेक्षित हंगाम नव्हता, पण या प्रवासाबद्दल मी आभारी आहे. पुढील आव्हान आणि भविष्यासाठी उत्सुक आहे. YBJ 65'
मात्र नंतर त्याने ही पोस्ट एडिट करुन पुन्हा लिहिले की,
'राजस्थान रॉयल्स, प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. हा आम्हाला अपेक्षित हंगाम नव्हता, पण आम्ही एकत्र या प्रवासासाठी आभारी आहोत. पुढील आव्हान आणि भविष्यासाठी उत्सुक आहे. YBJ 64"
या संकेतांमुळे त्याच्या भविष्याबद्दल आणखी प्रश्न निर्माण झाले आहेत. यापूर्वी आयपीएल सिझनच्या सुरुवातीला यशस्वी मुंबईची रणजी टीम सोडून गोव्याकडून खेळणार अशी बातमी आली होती. पण, नंतर त्यानं त्याचा निर्णय बदलत मुंबई संघातच राहण्याचा निर्णय घेतला.
इंग्लंड सीरिजवर लक्ष्य
यशस्वीचे पुढील लक्ष्य आता टीम इंडियाचा इंग्लंड दौरा आहे. भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यात पाच टेस्टची सीरिज खेळणार आहे. कॅप्टन रोहित शर्मानं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर यशस्वीसोबत ओपनिंगला कोण उतरणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.