Yograj Singh on Kapil Dev : टीम इंडियाचा ऑल राऊंडर युवराज सिंहचे (Yvraj Singh) वडील योगराज सिंह हे अनेकदा त्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यासाठी चर्चेत असतात. योगराज यांनी टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) अनेकदा टीका केली आहे. आता योगराज यांनी 1983 वन-डे वर्ल्ड कपचे कॅप्टन कपिल देव यांच्यावर टीका केली आहे.
योगराज सिंह यांनी 1981 साली एकमेव टेस्ट मॅच खेळली. त्यापूर्वी 1980 मध्ये त्यांनी वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पण त्यांना फक्त 6 वन-डेच खेळता आल्या. योगराज सिंह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्द अल्पजीवी ठरली. पण, भारतीय क्रिकेटबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ते नेहमी चर्चेत असतात. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यामध्ये त्यांनी महान क्रिकेटपटू कपिल देव यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. त्याबद्दल क्रिकेट फॅन्स नाराज आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले योगराज?
'आमच्या काळातील महान कॅप्टन कपिल देव... मी त्याला सांगितलंय की, जग तुझ्यावर थुंकेल अशी मी तुझी अवस्था करेल. आज युवराजकडं 13 ट्रॉफी आणि आहेत आणि तुझ्याकडं फक्त 1 वर्ल्ड कप ट्रॉफी आहे. विषय संपला.' असं संतापजनक वक्तव्य योगराज यांनी केलंय.
'धोनीनं आरशात चेहरा पाहावा'
योगराज सिंहनं या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंह धोनीवरही पुन्हा टीका केलीय. धोनीनं माझा मुलगा युवराजवर अन्याय केला, मी त्याला कधीही माफ करणार नाही, असं योगराज यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : अनलकी क्रिकेटर : 13 वेळा एकाच घटनेची शिकार झालेल्या क्रिकेटपटूची 26 व्या वर्षीच निवृत्ती )
'मी महेंद्रसिंह धोनीला कधीही माफ करणार नाही. त्यानं स्वत:चा चेहरा आरशात पाहावा. तो खूप मोठा क्रिकेटपटू आहे. पण, त्यानं माझ्या मुलाबद्दल जे केलंय ते आता समोर येत आहे. मी त्याला आयुष्यात कधीही माफ करु शकत नाही. मी आयुष्यात दोन गोष्टी कधीही केल्या नाहीत. 'माझं वाईट करणाऱ्यांना कधीही माफ केलं नाही आणि दुसरं म्हणजे त्यांना कधीही मिठी मारली नाही. मग ते माझे कुटुंबीय किंवा माझे मुलं देखील असूदे...' असं योगराज यांनी सांगितलं.