1st July New Rule| सामान्यांच्या खिशाला उद्यापासून कात्री लागणार, 1 जुलैपासून बदलणार आर्थिक नियम

सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी बातमी. कारण उद्यापासून सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे, उद्यापासून अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत. दैनंदिन जीवनाशी संबंधित या नव्या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर आणि रोजच्या खर्चावर होणार आहे. नवीन नियमांमध्ये बँकिंग, रेल्वे, गॅस सिलिंडरचे दर, पासपोर्ट शुल्क, आधार अपडेट, क्रेडिट कार्ड सुविधा तसंच UPIद्वारे PF काढण्यासारख्या सेवांचा समावेश आहे. तेल कंपन्यांकडून एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या नव्या दरांची घोषणा होऊ शकते. रेल्वेच्या दंड नियमांमध्येही बदल होणार आहेत. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई होऊ शकते.

संबंधित व्हिडीओ