महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावरती स्नान करण्यासाठी देश विदेशातील भक्त प्रयागराजमध्ये दाखल होतायत. याच ठिकाणी काही विकृत लोकांकडनं महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो, रॉर्डिंग केल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये त्यागराज आणि महाराष्ट्रातील काही संशयितांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सांगली मधील दोन युवकांना लातूर मधून ताब्यात घेण्यात आले. या युवकाला अहमदाबाद येथील सायबर पथकानं शिराळा पोलिसांच्या मदतीनं अटक केली आहे.