Tamil Nadu च्या जनतेसाठी 200 युनिट मोफत वीज; मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच Vijay यांचे धडाकेबाज निर्णय

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच विजय यांनी तीन धडाकेबाज निर्णय घेतले. मुख्यमंत्री म्हणून विजय यांनी जाहीरनाम्यातल्या आश्वासनाची पूर्ती करणाऱ्या निर्णयांवर स्वाक्षरी केली. तामिळनाडूच्या जनतेसाठी 200 युनिट मोफत वीज पुरवठा करण्याच्या निर्णयावर त्यांनी सही केली. तसंच अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना केली. तर तिसरा निर्णय हा महिलांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी स्वतंत्र विशेष कृती दलाची निर्मिती करण्याबाबतचा होता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विजय जोसेफ यांनी राज्याला पारदर्शक आणि स्वच्छ प्रशासनाचे आश्वासन दिलंय.

संबंधित व्हिडीओ