२०२६ हे वर्ष देशात निवडणुकांचं वर्ष ठरणार आहे. कारण तब्बल पाच राज्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. पाच राज्यातील सुमारे १७ टक्के लोकसंख्या त्यांचे प्रतिनिधी निवडणार आहेत. तर जगाचा विचार केला तर तब्बल ३६ देशांमध्ये ही निवडणुका होणार आहेत. त्यातील दोन निवडणुका तर भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्येच होणार आहेत. पाहूया कुठे कुठे निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे ते