22,500 स्क्वेअर फुटाचं Dharavi Experience Centre; धारावीचे वास्तव काय? धारावीचा चेहरा कसा बदलणार?

धारावीकरांचं घराचं स्वप्न आता साकार होणार आहे. धारावी म्हणजे आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी... मात्र आता या धारावीचा पुनर्विकास फक्त कागदावर न राहता तो प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरताना दिसतोय. धारावीकरांचं भविष्यातलं घर कसं असेल.... रस्ते, गार्डन आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा कशा असतील याची प्रत्यक्ष अनुभूती आता धारावी एक्सपिरिअन्स सेंटरमध्ये घेता येणार आहे. पुनर्विकासानंतर धारावीकरांना हक्काचं आणि सुसज्ज घर तर मिळणारच....सोबतच त्यांचं जीवनमान देखील उंचावणार आहे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या पात्र धारावीकरांना साडेतीनशे चौरस फुटाचं घर मिळणार आहे. तर याच परिसरात अनेक इमारती देखील आहेत ज्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या इमारतींमध्ये राहणाऱ्या धारावीकरांना पुनर्विकास झाल्यानंतर कमीत कमी पाचशे चौरस फुटांचं घर मिळणार आहे. सध्या धारावीचे वास्तव काय आहे आणि धारावीचा चेहरा कशाप्रकारे बदलणार आहे पाहुयात याबाबतचा एक विशेष रिपोर्ट..

संबंधित व्हिडीओ