मुंबईकरांच्या खिशातले 260 कोटी वाया, मेट्रोसाठी बांधलेला पूल पाडावा लागणार? नेमका घोळ काय? Mumbai

मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... मुंबईतल्या नियोजनाचा आणखी एक बट्ट्याबोळ समोर आलाय.मुंबईकरांचे २६० कोटी अक्षरशः वाया गेलेत.मेट्रो 7 अ मार्गिकेसाठी कोट्यवधी खर्च करून बांधलेला एक पूल आता तोडावा लागणार आहे. आणि याला जबाबदार आहे सल्लागार कंपनीचा हलगर्जीपणा. मेट्रो मार्गिका 7 अ... गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी ही महत्त्वाची मार्गिका. याच मार्गिकेवर हा पूल बांधण्यात आला. 260 कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र आता हा पूल तोडण्याची वेळ आली आहे. कारण... या पुलाची उंची मेट्रोच्या OHE म्हणजेच ओव्हरहेड वायरसाठी अपुरी पडतेय.या संपूर्ण प्रकरणावर अखेर MMRDA ने स्पष्टीकरण दिलं आहे. आणि आपली चूक थेट सल्लागार कंपनीवर ढकलली आहे. ज्यांची प्लानिंग करण्याची जबाबदारी आहे, त्यांनी योग्य काम न केल्यामुळे हा प्रकार घडतोय. महापालिका आणि MMRDA लुटली गेली आहे. भविष्याचा विचार न करता हे करण्यात आले आहे.. असं MMRDA नं म्हटलंय... या ब्रिजचा नेमका काय घोळ झालाय... याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी

संबंधित व्हिडीओ