टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी भिवंडी न्यायालयात तब्बल ३५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या चार्जशीटमध्ये इलेक्ट्रॉनिक पुराव्यांसह साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील महत्त्वाची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या भूमिकेचा सखोल तपास केल्यानंतर दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या खटल्यासाठी विशेष जलदगती न्यायालयाची व्यवस्था करण्यात आली असून भिवंडी प्रथम वर्ग न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यभर गाजलेल्या या पेपरफुटी प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.