नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा येथे ७० ते ७५ जणांना विषबाधा झाली आहे. विहिरीतील पाणी पिल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या पथकाकडून उपचार सुरू आहेत आणि सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.