संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राचं अवघं राजकीय वातावरण ढोळून निघालंय. या प्रकरणामुळं मंत्री धनंजय मुंडेंनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. पण धनंजय मुंडेंवर आरोपांचे घाव करणाऱ्या सुरेश धस यांना आता मायेचा पाझर फुटला. सुरेश धसांनी थेट धनंजय मुंडेंची भेट घेतली. आणि या भेटीसाठी मध्यस्थी केली भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी. त्यामुळे बीडमध्ये नेमकं चाललंय काय? हा प्रश्न आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या गुप्त भेटीचं कारण नेमकं काय होतं? पाहुयात हा रिपोर्ट. फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो. तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतय खेळतंय. देशमुख कुटुंबियांच्या आश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला.