BJP News | भाजप 'चिंतन बैठकी'पूर्वी दिल्लीत बैठकांचे सत्र, मंत्रालयांचे तयार करणार 'रिपोर्ट कार्ड'

BJP News | भाजप 'चिंतन बैठकी'पूर्वी दिल्लीत बैठकांचे सत्र, मंत्रालयांचे तयार करणार 'रिपोर्ट कार्ड' A series of meetings in Delhi ahead of the BJP's 'brainstorming session'; 'report cards' for ministries to be prepared. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या २३ आणि २४ सप्टेंबर ला दिल्लीतील 'सेवा तीर्थ' इथं केंद्रीय मंत्रिमंडळाची चिंतन बैठक बोलावली आहे.  सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी सर्व मंत्रालयांचे रिपोर्ट कार्ड तयार केले जाणार आहे.  सर्व केंद्रीय मंत्र्यांना २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान दिल्लीतच उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  मंत्र्यांचे ५-६ गट स्थापन: मंत्रालयांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी १५ ते २० मंत्र्यांचा समावेश असलेले ५ ते ६ गट तयार करण्यात आले आहेत.  पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या नेतृत्वाखालील एका गटाची बैठक पार पडली.

संबंधित व्हिडीओ