धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता आहे. भाजपसोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसून भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्याने यापूर्वीच राष्ट्रवादीनं ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता.