जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याची मालिका सुरूच असून भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांचा मुलगा विशाल भोळे यांच्या बिनविरोध निवडीनंतर भाजपाच्या दीपमाला काळे या प्रभाग क्रमांक 7 अ मधून बिनविरोध निवडून आल्यात. त्यांच्या विरोधात असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने माघार घेतली. तसेच प्रभाग क्रमांक 16 अ मधून डॉ. वीरेन खडके हे बिनविरोध निवडून आले. अपक्ष आणि मनसेच्या उमेदवारांनी त्यांच्याविरोधात माघार घेतली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे सागर सोनवणे हे प्रभाग क्रमांक 2 अ मधून बिनविरोध विजयी झाले असून त्यांच्या विरोधातील सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. आतापर्यंत भाजपाचे 4 तर शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या यशानंतर महापालिकेबाहेर भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोरदार जल्लोष केला