सीजेपीच्या 'लहरा दो तिरंगा' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला... काल अभिजीत दीपकेला दिल्ली पोलिसांनी मोर्चाआधीच ताब्यात घेतलं आणि अटक केली.. शांतता भंग केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला नवी दिल्लीतील एसईएम न्यायालयात हजर केलंय. दरम्यान, दीपकेला कारागृहात पाठवायचे की जामिनावर मुक्त करायचे, याचा निर्णय एसईएम न्यायालय घेईल. काल घडलेल्या घटनेच्या संदर्भात शांतता भंग केल्याप्रकरणी हा नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. यापूर्वी, 10 ऑक्टोबर रोजी विमानप्रवासादरम्यान दीपकेला ताब्यात घेण्यात आलं होतं.. तेव्हाही शांतता भंग केल्याप्रकरणी एक स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या प्रकरणात, त्याने एक वर्षापर्यंत शांतता भंग न करण्याचे लेखी त्याने दिलं होतं.
Abhijeet Deepke has been produced before the SEM court; will he be remanded to custody or granted bail? The SEM court will make the decision.