AC च्या गारवा हवा आहे? मग रिकामा करावा लागणार खिसा...AC Prices मध्ये 5 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ

वाढत्या उन्हामध्ये तुम्हाला एसीचा गारवा हवा असेल तर मात्र खिसा रिकामा करावा लागेल. एसी खरेदी करण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे.. एसी कंपन्यांनी किंमती 5 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत.. तांबे-ॲल्युमिनियमच्या किमती वाढल्याचा परिणाम तसंच कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि मालवाहतुकीच्या खर्चात वाढ झाल्यानं दर वाढवल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे.. भारतात दरवर्षी जवळपास दीड कोटी घरगुती एसी विकले जातात.

संबंधित व्हिडीओ