चार राज्यात 28 पैकी 12 जागांवर Congress लढली, 12 जागांपैकी एकाही जागेवर काँग्रेसला यश नाही

काँग्रेससाठी विधान परिषद निवडणुकांचा निकाल मोठा धक्का ठरला आहे... चार राज्यांतील 28 जागांपैकी 12 जागांवर लढूनही काँग्रेसला एकाही ठिकाणी विजय मिळवता आलेला नाही. कर्नाटकात सत्ता असूनही खाते उघडता आले नाही, बिहारमध्ये आरजेडीसोबतचा संघर्ष महागात पडला, तर महाराष्ट्रात दोन विद्यमान जागा गमावण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली आहे. एसआयआरवरून भाजप आणि एनडीएवर टीका करणाऱ्या काँग्रेसला मतपेटीत मात्र मोठा फटका बसल्याची चर्चा रंगली आहे.

संबंधित व्हिडीओ