तुम्हीही जर अवधूत साठेंच्या भरवशावर किंवा जाहिरात बघून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर सावधान.. कारण सेबीने अवधूत साठेंना मोठा दणका दिलाय.अवधूत साठे हे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि अवधूत साठे अकॅडमीमधून शेअर बाजारातील ट्रेडिंगचे प्रशिक्षण देतात. त्यांच्या एका कोर्सची फी 85 हजार रुपयांपर्यंत असल्याचा उल्लेख आहे.त्यांच्या यूट्यूब चॅनलचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत. मात्र आता याच अवधूत साठेंकडून सेबीने 546 कोटींची वसुली करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच त्यांनमा शेअर बाजारात प्रवेश करण्यापासून तातडीने रोखलंय. त्यांना आता शेअर बाजारामध्ये खरेदी-विक्री करणे, डीलिंग करणे किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नोंदणी नसतानाही पैसे गुंतवण्याचा सल्ला देत असल्याचा आरोप अवधूत साठेंवर आहे.