अकोला जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा आता शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या आहेत. दरम्यान, अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील निंबा येथील अल्पभूधारक शेतकरी गोपाल राठोड यांच्या घराला आज न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात सील लावण्यात आले. २०१८ मध्ये महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या एक लाख रुपयांच्या गृहकर्जाची थकबाकी १ लाख ३८ हजार ३४६ रुपयांवर पोहोचली होती. तसेच राठोड यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती असून, यंदा दुष्काळामुळे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. आज सील केल्यानंतर न्यायालयीन आयुक्त म्हणून नियुक्ती केलेल्या वकिलाला दहा हजार रुपये देण्याचं आदेशात नमूद केलय.. दुसरीकडे, वडिलांच्या पेन्शनमधून ते घराचे हप्ते भरत होते.. एकंदरीत ४५ हजार रुपये आतापर्यंत त्यांनी भरले असल्याचे म्हटले..
Farmer's house sealed following court order; Ravikant Tupkar rushes to the farmer's aid | Akola