महाराष्ट्रामध्ये सध्या गाजणारे दोन प्रश्न कुठले.... एक म्हणजे अतिवृष्टी... आणि दुसरा म्हणजे आरक्षण...... उपमुख्यमंत्री अजित पवार अतिवृष्टीची पाहणी करायला बीडमध्ये पोहोचले.... आणि मातीवर बोलता बोलता जातीवर बोलून गेले.... नुसतं बोलले नाहीत.... तर आरक्षणावर मराठे विरुद्ध ओबीसी असा संघर्ष असताना अजित पवारांनी आरक्षणावर अत्यंत महत्त्वाचं विधान केलं.... सुप्रिया सुळेंपाठोपाठ अजित पवारांनीही आर्थिक निकषांवर आरक्षण असावं असं म्हटलंय... त्यानंतर पुन्हा आरक्षणाचं राजकारण सुरू झालंय