संतोष देशमुखांच्या हल्लेखोरांना अटक करण्यासाठी बीडमध्ये सर्वपक्षीय रस्त्यावर उतरले. पण या सर्व पक्षांमधील सरकारचेच नेते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत होते. सर्व पक्षीय नेते धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक होण्यामागचं नेमकं कारण काय आहे? आणि त्यातही सरकारमधलेच आमदार हे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी का करतायत?