बीड जिल्ह्यातील कृषी विक्रेते उद्यापासून संपावर जाणार आहेत…खत विक्री आणि इतर मागण्यांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र ऐन हंगामातील या संपाचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे..दरम्यान, शेतकरी संघटनांनी अद्याप या संपाला पाठिंबा दिलेला नाहीय, बैठकीनंतरच भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिलीय