Ahilyanagar | धीरज परदेशी प्रकरण | नागरदेवळा ग्रामपंचायतीची आरोपी सय्यदच्या घरावर अतिक्रमणाची नोटीस

अहिल्यानगरमध्ये महापालिका कर्मचारी धीरज परदेशी हल्ला प्रकरणात आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता आणखी एक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी सय्यदच्या आलमगीर भागातील घरावर नागरदेवळा ग्रामपंचायतीने अतिक्रमणाची नोटीस लावली आहे. यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय आणि गटविकास अधिकारी कार्यालयालाही पाठवण्यात आला असून संबंधित अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपी सय्यदच्या घरावर नागरदेवळा ग्रामपंचायतीने अतिक्रमणाची नोटीस बजावली आहे. आलमगीर भागातील या घरासंदर्भातील माहिती जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय आणि गटविकास अधिकारी कार्यालयाला देण्यात आली असून अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित व्हिडीओ