Ahilyanagar| चारा, पाणी आणि हाताला काम द्या, पाथर्डी तालुक्यात जनावरांसह शेतकरी रस्त्यावर

पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसरातील शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. कल्याण–निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील तुळजवाडी फाटा येथे बैलगाड्या आणि जनावरांसह रास्ता रोको करण्यात आला. जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी आणि शेतकऱ्यांना हाताला काम मिळावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या.दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि पशुधनासमोर निर्माण झालेल्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. Ahilyanagar | Provide fodder, water, and employment—farmers in Pathardi taluka take to the streets along with their livestock.

संबंधित व्हिडीओ