Ahilyanagar| तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री जखमी, महाराजांनी स्वत: वार केले? रुग्णालयात उपचार

अहिल्यानगरमध्ये तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज गंभीर जखमी झालेत.आदिनाथ शास्त्री महाराजांनी स्वतःवरच वार केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.महाराजांनी स्वतःवरच वार कशामुळे याच कारण अद्याप कळलेलं नाही.जखमी अवस्थेत अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळालीय.पाथर्डी आणि बीड जिल्ह्यात महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे. या घटनेमुळे भक्त परिवारात मोठी खळबळ उडालीय.घटनेची माहिती मिळताच पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, भाजप युवा नेते अक्षय कर्डिले रुग्णालयात दाखल झाले.

संबंधित व्हिडीओ