मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा मुद्दा विधानपरिषदेत गाजला.. मुंबईतल्या वायू प्रदुषणाचा मुद्दा गंभीर आहे. सर्वात जास्त प्रदूषण हे खेरवाडीत असल्याचा दावा ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी केला. नियम कडक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी अनिल परब यांनी केली. त्यावर जागरुक पद्धतीने कारवाई सुरु असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दिली..