पान मसाला जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. अभिनेता अजय देवगणने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएच्या नोटीसला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या जाहिरातीसंदर्भात अजय देवगण, शाहरूख खान आणि टायगर श्रॉफला नोटीस पाठवली.. यापैकी दोघांनी वैयक्तिक सुनावणीची मागणी केली होती आणि ती पूर्ण झाली. या प्रकरणी अजय देवगणनं कोर्टात धाव घेतलीय.