Bajrang Sonawane यांनी दिलेली 500 ची नोट Ajit Pawar यांनी नाकारली, व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा

जेव्हा खासदार बजरंग सोनावणे यांनी दिलेली पाचशे रुपयांची नोट अजित पवार नाकारतात त्याबाबतची बातमी.... त्याचं झालं असं की, बीडच्या सहकारभवनाच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते झालं. यावेळी पूजेसाठी बसलेल्या अजित पवारांना पुरोहिताला दक्षिणा द्यायची होती..पण अजित पवारांच्या खिशात त्यावेळी पैसे नव्हते..दादांची ही अडचण शेजारी असलेल्या बाबासाहेबां पाटलांना समजली, त्यांनी आपल्या खिशातून पैसे देण्याची तयारी दाखवली, पण दादांनी त्यांना खुणेनेच नकार देत आपल्या शेजारी बसण्यास सांगितलं...त्याचवेळी मागे उभे असलेले बजरंग सोनवणे यांनी आपल्या खिशातून पाचशे रुपयांची नोट काढत शेजारी असलेल्या संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली.. संदीप क्षीरसागर आणि ती नोट आमदार विक्रम काळे यांच्याकडे दिली.. आणि विक्रम काळे यांनी ती नोट अजित पवार यांना देण्याचा प्रयत्न केला, पण अजित पवारांनी ती नाकारली..त्यामुळे हिरमुसलेल्या बजरंगआप्पा सोनावणेंनी पुन्हा ती नोट आपल्या खिशात ठेवून दिली... हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून याची चर्चा होत आहे...

संबंधित व्हिडीओ