गुंडांना उमेदवारी दिल्याच्या आरोपावरून Ajit Pawar यांचं स्पष्टीकरण | NDTV मराठी

पुण्यामध्ये निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर होतोय.. तुरुंगात असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींना, तसेच कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नी जयश्री मारणे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप आहे. या आरोपांवर पत्रकार परिषदेत उत्तर देताना अजित पवारांनी मात्र अंग झटकलंय.. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट यांच्यासोबत युती केली असून त्यांना काही जागा सोडल्या आहेत.. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय त्यांचा असल्याचे अजितदादांनी सांगितलं. मात्र कोणत्या जागा खरात गटाला दिल्या आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे एबी फॉर्म खरात गटाने वाटले का, असा प्रश्न उपस्थित होतोय..

संबंधित व्हिडीओ