दादांचं अपूर्ण स्वप्न, निर्धार आणि वारसदार; काय आहे ही अपूर्ण स्वप्न, निर्धार आणि वारसदारची स्टोरी?

सध्या रुपाली चाकणकरांचे खरातांशी संबंध, नरहरी झिरवाळ प्रकरणात राष्ट्रवादी अडचणीत आहे.एखादा पक्ष आधीच अडचणीत असला की दुसऱ्या पक्षाकडून त्याची कोंडी केली जाते... असाच काही प्रयत्न राष्ट्रवादीच्या बाबतीत होतोय की काय, अशी शंका असतानाच. अदिती तटकरे यांनी एक निर्धार केलाय.. सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करावं आणि मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा अदिती तटकरेंनी व्यक्त केलीय.अदिती तटकरेंच्या या इच्छेबद्दल प्रत्येक राजकीय पक्षानं आपापल्या चष्म्यातून बघत उत्तरं दिलीयत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलाय.तर सुनेत्रा पवारांची नणंद आणि शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्यायत.तर ठाकरे गटानं यावर बोलताना एका दगडात तीन पक्षी मारलेत.पाहुया काय आहे ही अपूर्ण स्वप्न, निर्धार आणि वारसदारची स्टोरी.

संबंधित व्हिडीओ