शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी आकाशवाणी आमदार निवासमधील कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. कालही या मारहाणीचे पडसाद उमलटे होते. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनीही गायकवाडांच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली होती. आज आमदार गायकवाडांना एकनाथ शिंदे प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावण्याची शक्यताही आहे. या मारहाणीचा निषेध आज विरोधकांकडून केला जाऊ शकतो. पायऱ्यांवर विरोधक संजय गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे