Akola| उबाठा शहरप्रमुख राहुल कराळेंना जीवे मारण्याची धमकी, भाजप शहराध्यक्ष जयंत मसनेंनी फेटाळले आरोप

अकोला शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच, ठाकरे गटाचे शहरप्रमुख राहुल कराळे यांचे वाहन अडवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. याप्रकरणी राहुल कराळे यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून, त्यांनी काही गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती तसेच भाजपचे महानगराध्यक्ष जयंत मसने यांच्यावर थेट आरोप केले आहेत. तर दुसरीकडे, जयंत मसने यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत जोरदार प्रतिवाद केलाय. या राजकीय संघर्षामुळे अकोल्याच्या राजकारणात सध्या तीव्र कलगीतुरा रंगला असून, दोन्ही पक्षांचे नेते आमने सामने आले आहेत. Akola | Death threat issued to UBT city chief Rahul Karale; BJP city president Jayant Masne refutes allegations

संबंधित व्हिडीओ