Akola| Congress कार्यकर्त्यांमध्ये माईकवरून वाद, भाषण करू न दिल्याने दोन कार्यकर्ते भिडले

अकोल्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात माईकवरून कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. माईकवर बोलण्यासाठी संधी न दिल्याच्या कारणावरून एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर नाराजी व्यक्त करत “मला का डावलले, मला का बोलू दिले नाही?” असा सवाल केला. यानंतर दोघांमध्ये वाद वाढला. या घटनेत दोघांमध्ये झटापट झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, माईकवरून झालेल्या या वादामुळे काँग्रेसच्या कार्यक्रमातील कार्यकर्त्यांच्या शिस्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

संबंधित व्हिडीओ