Akola | फायनान्सच्या वसुलीमुळे शेतकरी कुटुंब उघड्यावर, तीन लहान मुलांसह कुटुंबाची रात्र रस्त्यावर

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निंबा येथे मायक्रो फायनान्स कंपनीच्या वसुलीमुळे गोपाल राठोड या शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर आलं आहे...न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात त्यांच्या घराला सील लावण्यात आलं, त्यामुळे तीन लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाला घराबाहेर रात्र जागून काढावी लागली...दुसरीकडे दिवाळी अवघ्या दहा दिवसांवर आली असताना सरकारने घोषित केलेली पाच हजार रुपयांची मदत अद्याप मिळालेली नसल्याने कुटुंबाची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे...अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रदीप शिरसाट यांनी दिवाळी फराळासाठी आर्थिक मदत केली आहे...दरम्यान मायक्रो फायनान्स कंपन्यांवर नियंत्रण आणण्यासाठी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायदा करावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी केली असून राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी या कुटुंबाला मदतीचा हात द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे...

संबंधित व्हिडीओ