Akola | अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात मुदतबाह्य सलाईनचा वापर,हृदयविकाराच्या रुग्णाला एक्सपायरी सलाईन

अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात मुदतबाह्य सलाईन लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. हृदयविकाराच्या झटक्याने दाखल असलेल्या सुरेश वाकोडे यांना एक्सपायरी डेट संपलेली सलाईन लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सलाईनची मुदत १० ऑक्टोबर २०२६ रोजी संपली होती. सलाईन लावल्यानंतर रुग्णाला ताप आल्याने नातेवाईकांनी तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला... दरम्यान याप्रकरणी माजी आमदार अमोल मिटकरींनी ट्विट करत कारवाईची मागणी केलीय. तर वंचितने देखील आंदोलनाचा इशारा दिलाय.

संबंधित व्हिडीओ