राज्यात 70 टक्के भागात दुष्काळ पडलाय. बळीराजा आधीच आर्थिक संकटात सापडलाय. याचवेळी अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा घरी जाऊ नका असे आदेश राज्य सरकारने गेले आहेत. मात्र अकोल्यात सरकारच्या आदेशांना फायनान्स कंपनीने केराची टोपली दाखवलीय. डोंगरगावमध्ये वसुलीच्या नावाखाली फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चक्क शेतकऱ्याच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीचे फोटो काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. शेतकऱ्यांच्या घरात घुसून फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी गुंडगिरी करतायत. शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढणाऱ्या त्या मुजोर कर्मचाऱ्यांवर आणि संबंधित फायनान्स कंपनीवर जिल्हा प्रशासन तातडीने कारवाई करणार का? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Akola | Farmer's house entered for loan recovery and wife photographed; what instructions did Eknath Shinde give?