Akola Rains | मध्यरात्री मुसळधार पाऊस, अकोल्यात कपाशी आणि तूर पिकांना मिळणार संजीवनी । NDTV मराठी
Akola Rains | Heavy rain at midnight; cotton and tur crops in Akola to get a vital boost | NDTV Marathi
अकोला जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर शनिवारी मध्यरात्री जोरदार हजेरी लावली. यंदाच्या खरीप हंगामात अल निनोमुळे पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते आणि हंगाम धोक्यात आला होता. अशा संकटकाळात दीड ते दोन तास कोसळलेल्या या धुवाधार पावसामुळे तापमानात मोठी घट होऊन ३६ अंश सेल्सिअसवरील उकाडा कमी झाला आहे आणि हवेत गारवा निर्माण झाला आहे.