Akola| उड्डाणपुलाचे अर्धवट काम ठरतंय अपघातांना निमंत्रण, शिवर हायवेवरील उड्डाणपुलाचं काम संथगतीने

अकोला शहरातील शिवर परिसरात उड्डाणपुलाच्या संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. आज पहाटे विमानतळासमोरील पेट्रोल पंपाजवळ भरधाव सुझुकी कारचे नियंत्रण सुटून ती डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात कारंजा लाड येथील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. उड्डाणपुलाच्या कामामुळे महामार्ग अरुंद झाला असून दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने अपघातांचा धोका वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे.

संबंधित व्हिडीओ