धाराशिवच्या तुळजापूर नगरीतील नगरोत्थान योजनेच्या तब्बल 156 कोटी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे KH या ठेकेदार कंपनीला ही कामे देण्यात आली आहेत.. या प्रक्रियेमागे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तुळजापूर शहरात नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्ते व इतर विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यातील कामे देखील या ठेकेदार कंपनीला देऊ नयेत, अशी ठाम भूमिका महाविकास आघाडीने मांडली आहे. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी घेऊन महाविकास आघाडीचे पदाधिकारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.