Amit Shah । गृहमंत्री अमित शाह पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, शाह आज रात्री कोल्हापुरात दाखल होणार
Amit Shah | Home Minister Amit Shah is visiting Maharashtra again; he is set to arrive in Kolhapur tonight.
केंद्रीय गृहमंत्री आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. रात्री उशिरा ते कोल्हापुरात दाखल होणार आहेत. शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. त्याआदी आज दुपारी २ वाजता एकसंबा, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव येथे माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या बिरेश्वर पतसंस्थेच्या अत्याधुनिक मुख्य कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर रात्री शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहावर मुक्काम करतील.