अमरावती जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट गडद झालंय... गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीनचे पीक करपले आणि हातातून गेले आहे. आता शेतकऱ्यांची संपूर्ण आशा कपाशी पिकावर टिकून असताना सिंचनाची सोय असताना देखील रोहित्र नादुरुस्त आहेत... शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार खंडित होत असलेल्या वीज संकटाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
Amravati | Drought has claimed the soybean crop, and cotton is also at risk; faulty transformers leave farmers without electricity for irrigation.