Amravati Hospital Fire | अमरावतीच्या अग्निकांड प्रकरणाला नवं वळण | NDTV Marathi

Amravati Hospital Fire | अमरावतीच्या अग्निकांड प्रकरणाला नवं वळण | NDTV Marathi अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय अग्नीतांडवप्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आलाय. PWD विभागाने फायर ऑडिटकडे 37 दिवस दुर्लक्ष केल्यानेच तीन नवजात बाळांचे प्राण गेल्याचं समोर आलंय. या हॉस्पिटलच्या फायर ऑडिटची मुदत 29 ऑगस्टलाच संपली होती. त्यामुळे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांनी फायर ऑडिटसाछी 25 जून रोजीच पत्र दिलं होतं. त्यानंतर 17 जुलै रोजी स्मरणपत्रसुद्धा पाठवलं.. मात्र त्याकडे 37 दिवस दुर्लक्ष केल्यानेच 3 नवजात बाळांचा बळी गेला. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी याच हॉस्पिटलमधल्या दुसऱ्या वॉर्डमध्ये वॉशिंग मशीन जळाल्याचं वरिष्ठांपासून दडवण्यात आलं होतं. #AmravatiFire #AmravariHospitalfire #ndtvmarathi

संबंधित व्हिडीओ