ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येतेय. हडपसरमधल्या एका अपक्ष उमेदवाराने हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलीय. धक्कादायक बाब म्हणजे त्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. सादिक उर्फ बाबू कपूर या 56 वर्षांच्या व्यक्तीने आत्महत्या केलीय. आत्महत्येसाठी त्याने हाताच्या पंजावर मजकूर लिहिलाय. तसंच 30 पानांची सुसाईड नोट लिहीली आहे.. या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 41 मधील उमेदवार फारुख शेख यांच्या नावाचाही उल्लेख आहे. पुण्यातल्या सय्यद नगर भागात 5 गुंठे जमीन होती. यावरुन फारुख शेख आणि सादिक उर्फ बाबू कपूर यांच्यात वाद सुरु होता. त्याच वादातून फारुख शेख यांच्याकडून सादिक यांना त्रास दिला जात होता असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे.