अशोक खरातच्या कोट्यवधींच्या भूखंडावर अतिक्रमणाचा नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय.सध्या भोंदू अशोक खरात हा नाशिक पोलिसांच्या कोठडीत असताना, कल्पना खरात अद्याप फरार आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, शिर्डीतील सुमारे चार एकर भूखंडावर अज्ञात व्यक्तींनी थेट नांगर फिरवत अतिक्रमण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.बाजारभावानुसार तब्बल पन्नास कोटींच्या आसपास किंमत असलेल्या या भूखंडावर नेमकं कोणाचा डोळा आहे? या जमिनीवर सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? आणि या अतिक्रमणामागे कोणाचा हात असू शकतो? या सगळ्याचा सखोल आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी…