‘फुले’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अनंत महादेवन आणि त्यांच्या टीमने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यासाठी ते राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पोहोचले होते. या भेटीदरम्यान यांनी चित्रपटासंदर्भात चर्चा केली. ‘फुले’ चित्रपटाबाबत राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय आहे हे त्यांनी जाणून घेतलं. यावेळी त्यांना चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा दाखवण्यात आला. अशी माहिती दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी दिली.हा चित्रपट येत्या 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.