अभिनेता सैफ अली खान हल्ल्यातून सावरत असतानाच त्याला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. कारण भोपाळमधली त्याची 15 हजार कोटीची संपत्ती केंद्र सरकार कुठल्याही क्षणी ताब्यात घेऊ शकते. ही सर्व प्रॉपर्टी शत्रू संपत्ती म्हणून घोषीत करण्यात आलीय. त्याविरोधात सैफनं हायकोर्टात दाद मागितली होती, त्यानंतर आदेशावर स्टे आला होता. तो स्टे आता कोर्टानं हटवलाय. त्यामुळे सैफची 15 हजार कोटीची संपत्ती सरकार जमा होऊ शकते. भोपाळमधली 15 हजार कोटीची संपत्ती ही सैफची मावस आजी आबिदा सुल्तान यांची आहे. पण त्या फाळणीनंतर पाकिस्तानला गेल्या. त्यानंतर हीच संपत्ती सैफच्या सख्ख्या आजीकडे आली. पण सरकार दरबारी ही संपत्ती शत्रू संपत्ती म्हणून नोंदवली गेलीय.