मी विधानसभा निवडणुकीत 10 ते 12 कोटी रुपये खर्च करून निवडून आलो असं आमदार प्रकाश सोळंके म्हणालेत. सोळंकेंच्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. निवडणूक आयोगाकडून 40 लाख खर्चाची मर्यादा असते मात्र सोळंकेंनी 10-12 कोटी खर्च केल्याची कबुली दिलीय,,याच व्हिडिओमुळे सोळंके अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. तर निवडणुक आयोगाच्या नियमांच्या बाहेर खर्च केला असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नाना पटोलेंनी केलीय.