पाकिस्तानच्या परंपरा, धर्म हा हिंदुंपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी केलंय. अनिवासी पाकिस्तानींसाठी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात मुनीर बोलत होते. मुनीर यांच्या भाषणात मदिना, कलमा, तकरीर अशा विविध मुद्यांचा समावेश होता. त्यांचं भाषण एखाद्या जनरलपेक्षाही मुल्लासारखं होतं असं विश्लेषणही आता केलं जातंय. खुद्द मुनीर यांना मुल्ला जनरल म्हणूनच ओळखलं जातं. पण त्यांच्या आताच्या भाषणाने अनेकांच्या भूवया उंचावल्यात. विशेष म्हणजे मुनीर यांनी हे वक्तव्य पाकिस्तानी पंतप्रधानांच्या उपस्थितीत केलंय.