मालेगाव स्फोटात Mohan Bhagwat यांच्या अटकेचे आदेश? पाहा सविस्तर रिपोर्ट | Malegaon Blast | NDTV

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष सुटल्यानंतर, आता एका धक्कादायक दाव्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीच्या तपासात सहभागी असलेले माजी ATS पोलीस निरीक्षक महेबूब मुजावर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्याचे किंवा "धरून आणण्याचे" आदेश आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते, असा दावा केला आहे. हे आदेश 'भगवा दहशतवाद' (Saffron Terror) सिद्ध करण्याच्या उद्देशाने देण्यात आले होते, असे मुजावर यांचे म्हणणे आहे. त्यांनी हे बेकायदेशीर आदेश पाळण्यास नकार दिल्याने त्यांची पोलीस कारकीर्द उद्ध्वस्त झाल्याचाही आरोप केला आहे.

संबंधित व्हिडीओ